इचलकरंजीतील पाणी प्रश्न तापला….

इचलकरंजी शहराला सुळकुड योजनेची मंजुरी झाली असूनही अंमलबजावणी अजूनही झाली नाही तर ही अंमलबजावणी व्हावी यासाठी एक ऑगस्ट पासून गेले पाच महिने प्रयत्न करूनही कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे कृती समितीच्या वतीने शहरातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांना जाहीररित्या 10 जानेवारी चा अल्टिमेटम देण्यात येत आहे.

तोपर्यंत लोकप्रतिनिधींकडून कोणतीही प्रगती झाली नाही तर त्यांच्याशिवाय पुढील चळवळ केली जाईल. तसेच एक जानेवारीपासून इचलकरंजी शहरात कोणत्याही कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व मंत्र्यांना काळे झेंडे व जाहीर निदर्शने करण्यात येतील असा इशारा समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात देण्यात आला.

शहराच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नाही असे गृहीत धरून कार्यक्रम केला जाईल अशी माहिती इचलकरंजी सुलकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. यावेळी प्रताप होगाडे, मदन कारंडे, संजय कांबळे, सागर चाळके, सयाजी चव्हाण, विकास चौगुले, अभिजीत पटवा, कॉ. सदा मलाबादे, सुषमा साळुंखे, रिटा रॉड्रीग्युस, वसंत कोरवी उपस्थित होते.