अध्यात्म म्हणजे नेमके काय? नक्की जाणून घ्या….

मित्रानो आज आम्ही तुम्हाला अध्यात्म म्हणजे नेमके काय याविषयी सविस्तर सांगणार आहे. सर्वसाधारणपणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो ते बरोबर कि चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म.

परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक.त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्याम होय.

परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस समजू घेणे व त्यावर (जन्म,मृत्यू,संकटे,आनंद,दु:ख इ)पूर्ण विश्वास ठेवणे,त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवर वर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे श्रध्दा जाग्रुत करणे.

मनासारखे कोणालाच जगता येत नसते,परस्थिती नुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात. चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच अशा सर्व इच्छा पुरतीचा मार्ग म्हणजे अध्यात्म.

मन शांत व स्वतःला स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे अध्यात्म. समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान .तेव्हा कुठल्याही परिस्थितीला सक्षम पाने तोंड देण्यास ह्या देहाला तयार करते ते आत्मज्ञान आणी ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म.

मनुष्य चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक परिस्थिती ओढावून घेत असतो कारण मनुष्य भावनेत जगत असतो .भावनेमुळेच तो सुखी अथवा दुखी होतो .सुखी भावना जर सुखी करते तर सर्व च भावना सुखकारक करण्या साठी काम करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.

मनुष्य चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक परिस्थिती ओढावून घेत असतो कारण मनुष्य भावनेत जगत असतो .भावनेमुळेच तो सुखी अथवा दुखी होतो .सुखी भावना जर सुखी करते तर सर्व च भावना सुखकारक करण्या साठी काम करणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म.

सत्य जाणून घेणे. वस्तू स्थिती हि सत्य व माया हि असत्य तेव्हा मायेच्या मोहातून बाहेर पडण्याचा अभ्यास करणे आवश्यक असतेच म्हणून खरे सुख काय व कशात आहे हे जाणण्याचा सराव म्हणजे अध्यात्म.

नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप/ताकद/आरोग्य देते. भीती फक्त मनात असते अन्य कोठे हि नसते .नको ते विचारच पराभवाला कारण असतात. ते काढुन टाकायला शिकवणारे शास्त्र आणी मग हे नि:शंक मन सतत परमेश्वराची आठवण ठेवते मग त्या आनुशंघाने परमेश्वराच्या सानिध्यात राहणे व याच रीतीने नि:शंक होऊन निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म.