भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 चा सुपर 4 सामना रविवार 21 सप्टेंबर रोजी खेळवला गेला. या सामन्यात टॉस जिंकून भारताने पाकिस्तानला फलंदाजीचं आव्हान दिलं होतं. यावेळी पाकिस्तानने 5 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 172 धावांचं आव्हान मिळालं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट राखून पूर्ण केलं. यासह टीम इंडियाने आशिया कप 2025 मध्ये सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून या सामन्यापूर्वी झालेला टॉस टीम इंडियाने जिंकला. कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आधी फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. पाकिस्तानने 5 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. यावेळी टीम इंडियाकडून शिवम दुबेने सर्वाधिक 2 विकेट तर हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली. टीम इंडियाला विजयासाठी 172 धावांचं आव्हान मिळालं होतं.
विजयाचं आव्हान पूर्ण करताना टीम इंडियाचे सलामी फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि शुभमन गिलने मैदानात तुफान फटकेबाजी केली. दोघांनी 105 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसनने जोरदार फटकेबाजी करून भारताला विजयाच्या जवळ पोहोचवलं. अभिषेक शर्माने 74, शुभमन गिलने 47, तिलक वर्माने 30, संजू सॅमसनने 13 तर हार्दिक पंड्याने 7 धावा केल्या. टीम इंडियाने ६ विकेट राखून विजयाचं आव्हान पूर्ण केलं.
