जर केंद्र शासनाची नोकरी करू इच्छित असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. लवकरच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही सविस्तरपणे प्रसिद्ध केली जाईल. सध्या याबद्दलची एक नोटीस बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. लवकरच उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तोपर्यंत कागदपत्रांची पुर्तता करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे.
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 2140 पदांसाठी होणार आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) च्या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हे करावे लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही अर्ज करू शकता.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. rectt.bsf.gov.in. साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. अजून या भरती प्रक्रियेची लिंक ही अॅक्टिव झाली नाहीये.
या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. 30 दिवसांच्या आतमध्ये या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना rectt.bsf.gov.in. या साईटवर जाऊन आपले अर्ज हे भरता येतील. सध्याच्या सूचनेनुसार ही भरती प्रक्रिया 2140 पदांसाठी पार पडत आहे. यामध्ये पुरूष 1723 आणि महिला 417 नुसार भरती सुरू होईल.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना विविध प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला rectt.bsf.gov.in या साईटवर जाऊनच अर्ज हा करावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे लागतील. लवकरच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.