लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता ‘या’ आठ दिवसात येणार

राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली.. आतापर्यंत जुलै ते जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमाही झाला..आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याकडे त्यांच्या नजरा लागल्या असताना येत्या आठ दिवसांमध्ये फेब्रुवारीचा 1500 चा हप्ता बँकेत जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान लाडक्या बहिणींना येत्या फेब्रुवारी चा हप्ता24 तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल. 24 तारखेला सोमवार येतो म्हणजे या दिवशी देखील बँका चालू असणार आहेत त्यानंतर 25, 26, 27 आणि 28 तारीख शुक्रवार पर्यंत तुम्हाला सर्व पैसे तुमच्या बैंक खात्यात ८व्या हप्त्याचे 1500 रुपये येऊन जातील. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.. त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे प्रतीक्षा संपली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.