वाढती लोकसंख्या लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वाढलेल्या(awareness) औद्योगीकरण, सिमेंटची जंगले यासाठी मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड व वृक्षतोडीमुळे ढासळलेले पर्यावरण यासाठी सर्व शालेय व सामाजिक स्तरावर वृक्ष लागवडी संदर्भात जनजागृती करून वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन युवा नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.
सन २०२३ – २४ मध्ये सांगोला वन विभागाकडे ३३ हजार वृक्ष रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.(awareness) याचाच एक भाग म्हणून वृक्ष लागवड सप्ताहामध्ये प. पू. भैयुजीमहाराज संचलीत केंद्रीय निवासी शाळा येथे वन विभाग सांगोला यांच्या वतीने वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली. यावेळी या मोहिमेचे कौतुक करताना डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील बोलत होते. यावेळी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर, वनपाल सुग्रीव मुंडे, वनरक्षक व्हरकुटे यांच्यासह शालेय शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील म्हणाले, संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे म्हटले आहे.
मानवाला थकवा आल्यानंतर, मनाचा थकवा घालवण्यासाठी अनेकजण पर्यटन व सहलीचे आयोजन करतात, हिरव्यागार वनस्पतीने आच्छादलेली पर्वतरांगा हे आपणास नेत्र सुखाचा अवर्णनीय आनंद देऊन जातात. मानवाच्या जीवनामध्ये वृक्षाला खूप मोठे महत्व व स्थान आहे. ढासळलेल्या पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाने एक वृक्ष लावणे व तो जोपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. यानिमित्ताने वन विभागाकडून सुरू असलेली वृक्ष लागवड मोहीम पर्यावरणासाठी उत्कृष्ट मोहीम आहे.
या निमित्ताने सर्व संस्था व शासकीय कार्यालयाने देखील सहभाग घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी सांगोला वन विभागाकडून वृक्ष लागवड मोहीम सुरू आहे त्याच अनुषंगाने वन सप्ताहाच्या माध्यमातून केंद्रीय निवासी शाळेवर वृक्ष लागवड केली यामधून आज लावलेली वृक्ष रोपे उद्याच्या विद्यार्थ्यांना आनंददायी परिसराची आठवण राहील. म्हणून सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा वृक्षतोड करू नका अशा पद्धतीचा संदेश सांगोला तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिला.