ना जातपात, ना पक्षपात फक्त लोकाभिमुख सोयी- सुविधा देण्याचे माझे मानस – आ. शहाजीबापू पाटील

उदनवाडीच्या मुख्य रस्त्यासाठी रोहयो मंत्र्यांना पत्र

ना जातपात, ना पक्षपात फक्त लोकाभिमुख सोईसुविधा देण्याचा (partiality) माझा मानस असल्याचे मौजे उदनवाडीच्या मुख्य रस्त्यासाठी रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे पत्र पाठवताना सांगोला विधानसभा आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे. याप्रसंगी सांगोला नगरपरिषद माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ उपस्थित होते. दरम्यान उक्त प्रकरणी विधानभवन माकप कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी यांचे कडे सदरहू पत्र मंत्रालयात पोच करण्याकरिता दिले असून यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, काही लोकांना वाटते की मी फक्त एका विशिष्ट जातीसाठी किंवा पक्षासाठी काम करतोय पण तसे काहीच नसून मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला सोईसुविधा मिळाली पाहिजे.

त्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आवश्यक तो निधी देखील उपलब्ध करून देणार आहे.(partiality) तसेच, आमदार पाटील म्हणाले की, विधानभवन मुलाणी हे सुट्टीवर असताना गावातील समस्या माझ्याकडे मांडल्या त्यावर त्वरित कारवाई म्हणून मौजे उदनवाडी डोंगरे डॉक्टर यांचा दवाखाना ते हायवेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यासाठी ५० लाख रुपये मंजूर करावे म्हणून महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांना पत्र लिहिले आहे त्याचा पाठपुरावा लवकरच करून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

माकप कार्यालय प्रमुख शाहरुख मुलाणी हे सुट्टीवर असताना गावातील समस्या माझ्याकडे मांडल्या त्यावर त्वरित कारवाई म्हणून मौजे उदनवाडी डोंगरे डॉक्टर यांचा दवाखाना ते हायवेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यासाठी ५० लाख रुपये मंजूर करावे म्हणून महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांना पत्र लिहिले आहे त्याचा पाठपुरावा लवकरच करून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांची भूमिका सातत्याने सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे.

त्यांनी सुचविलेल्या विकास कामाच्या पाठपुराव्याला सरकार नक्कीच अनुकूल प्रतिसाद देईल, आणि ही सर्व विकास कामे तातडीने पूर्ण होतील अशी ग्वाही यावेळी बोलताना रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. लोक प्रतिनिधींच्या मागणीनुसार रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक कामांना न्याय दिला जात असून मौजे. उदनवाडी ता. सांगोला गावातील ग्रामस्थांना देखील आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी बोलताना रोजगार हमी योजना विभागाने प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली.