पायोनियर स्कूल य.मंगेवाडीच्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या शास्त्रज्ञांना व जवानांना राख्या

राखी पौर्णिमा सणाच्या निमित्ताने य. मंगेवाडी येथील (Protect) पायोनियर इंग्लिश व सेमी इंग्लिश मिडीयम व पायोनियर गुरुकुल शाळेत विद्यार्थांच्या कल्पना शक्ती व कार्यक्षमतेचा विकास व्हावा या उद्देशाने या राखी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी कापड, कागद तसेच फुलांपासून सुंदर व आकर्षक रंगीबेरंगी राख्या बनविल्या होत्या. भारत मातेचे रात्रंदिवस रक्षण करणाऱ्या आपल्या बहाद्दूर जवानांना व चांद्रयान ३ यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना व इस्रो च्या शास्त्रज्ञांना स्वतः च्या हाताने बनवलेल्या राख्या स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या..

पायोनियर शाळा नेहमीच आपली संस्कृती जपण्याचे काम करत असते..(Protect) विद्यार्थांना ज्ञान व संस्कार देवून एक परिपूर्ण भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत असल्याबद्दल विविध स्तरातून पायोनियर शाळेचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचा उद्देश व महत्व शाळेची ८ वी तील विद्यार्थीनी कुमारी प्रणिती पवार हिने समजून सांगितला. तर सूत्रसंचालन शिक्षिका सौ. राऊत बी. टी. मॅडम यांनी केले. राखी प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष श्री अनिल येलपले सर व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री रूपनर सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी मेहनत घेतली.