तीन जिल्ह्यांना ‘महामार्ग’ नावाचे संकट उभे!

कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील ऊस, भाजीपाला, द्राक्षासह भाजीपाल्याच्या हिरवीगार सुपीक शेतीत सध्या ‘महामार्ग’ नावाचे संकट उभे ठाकले आहे.आधीच कमी जमीन धारणा असलेल्या या भागातील ५ हजार एकर शेती धोक्यात येणार आहे.

भूमिहिन होण्याच्या भीतीने अस्वस्थ झालेल्या येथील शेतकऱ्यांस अन्न गोड लागेनासे झाले आहे. शेतकरी या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात पेटून उठला आहे, नुकसान भरपाई पेक्षा महामार्गच नकोच अशीच मागणी जोर धरताना दिसत आहे.

जिल्‍ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा या तालुक्यातील साठ गावांतून हा महामार्ग पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. यातील बहुतांशी तालुके हे बागायती आहेत. ऊस, भाजीपाल्‍यासह अनेक नगदी पिके येथे घेतली जातात. सध्या घोषित नव्या शक्तिपीठ महामार्गाव्‍यतिरिक्त नागपूर-रत्नागिरी महामार्गही होत आहे. यासाठी हजारो वृक्षांची कत्तल अधिक झालेली आहे.

या मार्गाला समांतर नवा शक्तिपीठ महामार्ग नियोजित केल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापूर –

– तालुके – शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा

– गावे – ६०

– शिरोळ- कोथळी, दानोळी, निमशिरगांव, चिपरी.

– हातकणंगले- तारदाळ, हातकणंगले, तिळवणी, साजणी, माणगांव, पट्टणकोडोली करवीर

– कागल – कागल ग्रामीण, व्हानूर, सिद्धनेर्ली, वडगांव, एकोंडी, बामणी, व्हनाळी, केनवडे, सावर्डे खु., सावर्डे बु., सोनाळी, कुरणी, निढोरी.

– करवीर – विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बु.. सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, खेबवडे.

– भुदरगड – आदमापूर, व्हनगुत्ती, वाघापूर, मडीलगे बु., कुर, मडीलगे खु., निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, सोनारवाडी, मडुर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, वेंगरूळ, सोनिर्ले, मेघोली, नवले, देवर्डे, करिवडे.

आजरा – दाभिल, शेळप, परपोली, आंबार्डे, सुळेरान, किटवडे- महामार्ग एकूण किलोमीटर – १२९- एकूण जमीन: अंदाजे १२०० हेक्टर

सांगली –

तालुके – आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज गावे -१९-

आटपाडी – शेटफळे- कवठेमहांकाळ – घाटनांद्रे, तिसंगी- तासगाव – डोंगरसोनी, सिध्देवाडी-सावळज, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागाव कवठे.- मिरज – कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलवाडी.

महामार्ग एकूण किलोमीटर – अंदाजे ९०

एकूण जमीन अधिगृहण -अंदाजे ६०० हेक्टर