100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आज शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रभर शतक महोत्सवी नाट्य संमेलन पार पडणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलाय.
या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमधे शरद पवार (NCP Sharad Pawar) आणि अजित पवारांची (NCP Ajit Pawar) नावे आहेत. गेल्या काही दिवसांमधे अजित पवारांन शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलय. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यास शरद पवारांसोबत अजित पवार उपस्थित राहणार का? याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.
तब्बल 25 वर्षानंतर शहरात नाट्यसंमेलन होणार आहे. याआधी 79 वे नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरातील मैदानावर झाले होते. त्यावेळी आयोजनाची जबाबदारी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर होती. त्याशिवाय दिवंगत शिक्षणमंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि युवा अजित पवार यांनाही जबाबदारी पार पाडली होती. यावेळी नाट्यसंमेलनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे.
5 जानेवारी 2024 – पुण्यात शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ
6 जानेवारी 2024 – पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार
7 जानेवारी 2024 – विविध कार्यक्रमांचे आयोजन (महाराष्ट्रातील विविध शाखा व कलावंत सहभागी होणार)
20 आणि 21 जानेवारी 2024 – अहमदनगर
27 आणि 28 जानेवारी 2024 – सोलापूर
4 फेब्रुवारी 2024 – बीड
10 आणि 11 फेब्रुवारी 2024 -लातूर
17 आणि 18 फेब्रुवारी 2024 – नागपूर, मुंबई
पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काका आणि पुतणे उपस्थित राहणार आहेत, हा शहरात चर्चेचा विषय आहे. याआधी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत.