उन्हाळ्याच्या उष्णतेत अनेकजण गोड आणि रसाळ फळं खाण्याला प्राधान्य देतात. उष्म्याच्या ऋतूत ही फळे आरोग्यासाठी हितकारक असतात. अननस हे शरीरातील पचनक्रियेसाठी चांगले असते. तसेच त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. आज आपण जाणून घेऊया की अननस आरोग्यासाठी का फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यात त्याचे सेवन कसे करावे. अननस खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि आरोग्य चांगले राहते. त्यातील कॅल्शियम व मँगनीज हाडांचे आजार कमी करतात आणि स्नायूंना ताकद देतात. अननस हे शरीरातील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हृदयरोग आणि लठ्ठपणाचा धोका अननसामुळे कमी होतो. तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल, तर उन्हाळ्यात अननस नक्की खा. त्यामुळे पचन देखील सुधारते आणि पोटाची चरबी देखील कमी होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच, अननस आपली पचनक्रिया सुरळीत ठेवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अननस खाल्ल्याने उलट्या आणि मळमळ कमी होते, शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात अननस खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांचा धोका देखील कमी होतो आणि शरीर निरोगी राहते.
उन्हाळ्यात अननस का खावे ?
