जुन्या काळातील आठवणींना उजाळा ; चक्क बैलगाडीतून काढली नवरदेवाची वाजत-गाजत वरात मिरवणूक

आधुनिक काळात विवाह म्हणजे एकप्रकारे श्रीमंतीचे शक्तिप्रदर्शन होत आहे. अनेक ठिकाणी विवाह सोहळ्याचा लग्नाचा मोठा बडेजाव केला जातो. हल्ली लग्नासाठी लोक पाहण्यासारखा पैसा वाहू लागले आहेत. तसेच महागातल्या महागड्या गोष्टी आणू लागले आहेत. आपलं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं या सगळ्यात एका अशाच तरुण आणि शिक्षित रामचंद्र हेंबाडे आणि प्रियंका साळुंखे या जोडप्याची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वरातीत मिरवणुकीत व्यवहारिक रित्या बैलगाडीची मदत घेतली.

लोक हल्ली लग्नाची वरात मिरवणूक काढण्यासाठी महागड्या गाड्या किंवा फॅन्सी गोष्टीचा वापर करतात, परंतु या जोडप्याने मात्र चक्क बैलगाडीचा वापर केल्यामुळे अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. ढवळस येथील लग्न मिरवणूक याचे फोटो सोशल मिडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. ज्यामुळे त्यांची जोरदार चर्चा देखील सुरू झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष सिध्देश्वर हेंबाडे यांचे चिरंजीव रामचंद्र व सांगोला तालुक्यातील बामणी येथील विजय साळुंखे यांची कन्या प्रियंका यांची वरात चक्क बैलगाडीतून स्वार वाजत-गाजत काढल्यामुळे शेतीनिष्ठेची प्रचिती देणारा नवरदेव शेतकरी पुत्र म्हणून ओळख निर्माण झाली.

३० वर्षापूर्वी लग्न सोहळ्याची वरात बैलगाडीतून काढली जायची. आता आधुनिक युगात ही प्रथा बंद पडली होती. बैलगाडी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. बैलगाडा हकळणारा व्यक्ती उद्धव पवार, बापू लेंडवे सारथीच्या रुपात विराजमान झाला होता. त्याच्या मागे नवरा – नवरी हे राजा – राणीसारखी शोभून दिसत होते. संपुर्ण वरात बँडबाजाच्या गजरात गावातून मुख्य रस्त्यावरून वाजत – गाजत आनंद व्यक्त करीत होती.

गावातील जुन्या वयोवृध्द मंडळीना त्यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यासाठी विश्वनाथ हेंबाडे, रवींद्र हेंबाडे, आनंदा मोरे, जगन्नाथ हेंबाडे, संजय हेंबाडे , नवनाथ हेंबाडे, ज्ञानेश्वर बावचे, महेश हेंबाडे, बन्सीलाल हेंबाडे, जयनारायण हेंबाडे,रतीलाल हेंबाडे, आनंदा हेंबाडे, राहुल सूर्यवंशी, दीपक हेंबाडे, जितेंद्र हेंबाडे, अक्षय हेंबाडे,विशाल हेंबाडे, सिध्देश्वर (बबलू) हेंबाडे, मधुकर हेंबाडे, पांडुरंग हेंबाडे, सौरभ हेंबाडे, सागर घोडके, मारुती हेंबाडे आदींनी नियोजन व्यवस्था केली होती.