नुकताच सांगोला तालुक्यामध्ये माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा जनसंवाद व गावभेट दौरा संपन्न झाला. त्यांनी अगदी वाड्यावर जाऊन सामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. सांगोला तालुक्यातील मौजे लक्ष्मी नगर येथे गावांमधून जाणाऱ्या डांबरीकरणाचा रस्ता नवीन केल्यामुळे रस्त्यावरून वाहने जोरात चालवली जात आहेत त्यामुळे लहान मुलांसह महिला व नागरिकांना याचा धोका निर्माण झाला होता.
त्या संदर्भामध्ये नागरिक चिंताग्रस्त होते माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी मौजे लक्ष्मीनगर येथे गावभेट दौरा केला होता या दौऱ्यावेळी गावातील ग्रामस्थांनी नवीन रस्त्यावरती गतिरोधक करण्याची मागणी केली होती. यावेळी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गतिरोधक करण्याचे आदेश दिलेले होते.
त्यांच्या या आदेशाची दखल घेत या मौजे लक्ष्मीनगर येथील गावातील डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरती गतिरोधक केल्यामुळे मान. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या कामाचा कौतुक केले जात आहे. तसेच अतिशय तातडीने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतल्यामुळे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे ग्रामस्थानी आभार मानले. या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांविषयी मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील दखल घेतात हे आणखी एकदा सिद्ध झालेल आहे.