फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मध्ये गेट परीक्षा २०२४ या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च च्या स्पर्धा परीक्षा विभागाने गेट परीक्षा २०२४ या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. शिवानंद माळी यांनी तिसऱ्या व चौथ्या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गेट परीक्षा २०२४ आय. आय. टी. मुंबई, आय. आय. टी. रुडकी, आय. आय. टी. दिल्ली, आय. आय. टी. गुवाहाटी, आय. आय. टी. कानपुर, आय. आय. टी खरकपूर, आय. आय. टी. मद्रास, किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर यांच्याकडून आयोजित केली जाते.

या परीक्षा च्या आधारे मास्टर ऑफ इंजिनिअरींग, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयोजित करणार आहे, त्या अनुषंगाने परीक्षासाठी पात्रता काय असणार, अर्ज कसा भरावा, परीक्षेचे स्वरूप काय असते, परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो, परीक्षा शुल्क किती असते, परीक्षेची काठिण्य पातळी कशी असते, परीक्षा उत्तीर्ण होण्याचे फायदे काय आहेत आणि परीक्षेची तयारी कशी करावी या सर्व बाबीवर विद्यार्थीना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

हा कार्यक्रम चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, संचालक डॉ. डी.एस. बाडकर, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, पॉलिटेक्निक प्राचार्य डॉ. शरद पवार व प्रा. टी. एन. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.