सांगोला येथे विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग

गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने सांगोला शहरातील राजस्थानी मुर्ती कारागीर (speeding) तसेच ग्रामीण भागातील कुंभार वाड्यात लाडक्या विघ्नहर्ता गणरायाच्या विविध आकार रूपातील मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला असून मुर्तीकार गणेश मूर्तीना रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहेत सांगोला तालुक्यातील २२५ तर सांगोला शहरात ७४ सार्वजनिक गणेश मंडळ गणेशोत्सवाच्या जोरदार तयारीला लागले आहेत. यंदाही गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल,रंगाचे दर वाढल्यामुळे गणेश मूर्तीचे दर १० ते १५ टक्के वाढणार असल्याचे मूर्तिकार सचिन कुंभार, भंवरलाल बावरी यांनी सांगितले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही सर्व (speeding)समाजातील गणेश भक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरे करुन गणेशोत्सवाची परंपरा जोपासली जात आहे. त्यामुळे घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापना करून त्यांची मनोभावे ९ दिवस सेवा केली जाते. त्यानुसार यंदाही सांगोला तालुक्यात सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. राजस्थान येथील बावरी कुटुंबातील मूर्तिकार गेल्या अनेक वर्षापासून सांगोल्यात गणपती बनविण्याचे काम करीत आहेत. मागील सहा महिन्यापासून मुर्तीकार भंवरलाल बावरी, तेजा बावरी, गंगाराम बावरी, ढुंगाराम बावरी, चंपालाल बावरी रमेश बावरी, लालाराम बावरी, श्रवण बावरी कुटुंबातील सदस्य तसेच सांगोल्यातील सचिन कुंभार, गावोगावी व्यवसायिक लाडक्या विघ्नहर्ता गणरायाच्या विविध आकार रूपातील अर्ध्या फुटापासून ते पाच फुटापर्यंत उंचीच्या आकर्षक मूर्ती बनवून पूर्ण केल्या आहेत.

अष्टविनायक, लालबाग, दगडूशेठ हलवाई उंदरावर स्वार असलेला, पटेल, राजा गादीवरील शंकर पार्वती समवेत, सिंहासन विराजमान अशा विविध आकार रूपातील आकर्षित हजारो गणेश मूर्ती बनवून रंगरंगोटीचे कामे सुरू आहेत तर गणेश मूर्ती बरोबर गौराईचे ( महालक्ष्मी) मुकूट बनवून त्यांनाही रंगरंगोटी करण्यात येत आहे.गणेशोत्सव अवध्या महिन्यावर येऊन ठेपल्याने सांगोला व तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी निवडी पार पडल्याने गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाकडून शहरातील पंढरपूर रोड लगत राजस्थानी मूर्ती कारागीरांकडे तसेच गावोगावी कुंभार वाड्यात आपआपल्या पसंतीची गणेशमूर्ती बुकिंग सुरू केले आहे.