मंगळवेढ्याहून आंधळगावकडे एस.टी. बसमधून निघालेल्या एक विवाहित महिलेस दारुचे नशेत पाठीमागून केस ओढून हाताने लाथाबुक्याने मारहाण करततु माझेशी फोनवर का बोलत नाही, तु माझा फोन का उचलत नाही असे म्हणुन तु माझा येथुन पुढे फोन नाही उचलला तर तुला व तुझ्या मुलीला जिवे ठार मारुन टाकीन
अशी धमकी दिल्याप्रकरणी आंधळगाव येथील सौरभ चंद्रकांत शिंदे यांच्याविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी २९ वर्षीय विवाहित महिला १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सोलापूर येथील चुलत्याकडे गेल्या होत्या.
सोलापूर येथील काम संपल्यानंतर फिर्यादी व तिची मुलगी २० नोव्हेंबर २०२५ रोजी एस.टी. ने बोराळ नाका मंगळवेढा येथे उतरून नंतर ४ वाजता मंगळवेढा ते सांगोला जाणारे एस.टी. मध्ये बसून आंधळगाव येथे जात असताना सांगोला नाका येथे एस.टी. मध्ये हा प्रकार घडला.
त्यानंतर सदर एस.टी. बस मधील चालक व वाहक यांनी त्याला आढवून एस.टी. बसमध्ये भांडण करु नका असे सांगितले.
त्यानंतर एस.टी. बस मधून उतरुन त्याने हातात दगड घेवून फिर्यादीच्या पाठीत मारला. त्यावेळी लोकांनी त्यास गप्प बसण्यास सांगितले असता तो पुन्हा शिवीगाळी दमदाटी करत होता.
त्यामुळे एस.टी. चालक व वाहकाने एस.टी. बस पोलीस ठाणेस आणली. त्यावेळी सौरभ चंद्रकांत शिंदे हा दारु पिऊन बडबडत असल्यामुळे पोलीसांनी त्याची ब्रेथ अँनायलायजर टेस्ट केली असता तो दारू पिला आल्याचे आढळून आले.
