एमपीएससी परीक्षा व नगरपंचायत मतमोजणी एकाच दिवशी; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी २१ डिसेंबर २०२५ हा दिवस संभ्रमाचा ठरला आहे. कारण एमपीएससी आयोगाद्वारे घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ‘ब’ परीक्षा आणि नगरपरिषद व नगरपंचायतची मतमोजणी ह्या दोन्ही घटना एकाच दिवशी पार पडणार आहे.
संयुक्त पूर्व गट ‘ब’ परीक्षा ही ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार होती, पण पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारांना आशंका आहे की पुन्हा परीक्षा वेळापत्रकात बदल होणार आहे कि नाही.

सध्या भरली जाणारी पदे खालीलप्रमाणे आहेत:

सहायक कक्ष अधिकारी – 03 पदे

राज्य कर निरीक्षक – 279 पदे

दुय्यम निबंधक – 0 पदे

पोलीस उपनिरीक्षक – 392 पदे

आवाहन

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि संबंधित प्राधिकरणांनी उमेदवारांना स्पष्ट माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

उमेदवारांनी परीक्षा व मतमोजणीच्या दिवसासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरसोय होऊ नये.