पार्थ पवारांच्या कंपनीला पहिला धक्का, जमीन घोटाळ्याप्रकरणी पहिली अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे काही दिवसांपूर्वी अडचणीत सापडले होते. या प्रकरणी आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकण्यात आली होती. याप्रकरणी आता तिला अटक करण्यात आली आहे. यामुळे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.