घरच्या घरी मुलांसाठी काहीतरी हटके खेळ!

मित्रानो, बदलत्या जीवनशैलीमुळे बिचारी मुले त्यात भरडली जाऊ लागली. या लाडाच्या लाटेत मुलेच वाहून जाऊ लागली. त्यामुळे आता ‘मुलांचे खेळ आणि खेळणी’ याबाबतच विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जनरली सुटी सुरू झाली की ‘मुलांचे लाड कसे करावेत’ याबद्दल प्रत्येक घराच्या आपापल्या काही खानदानी कल्पना असतात. या कल्पना बहुधा त्या-त्या घरातील (महा)पुरुषांचे लाड त्यांच्या लहानपणी कशा प्रकारे झाले आहेत यावर अवलंबून असतात किंवा गरिबीमुळे आम्हाला जे लहानपणी मिळाले नाही ते आता तातडीने आपल्या मुलांना उपलब्ध करून देणे म्हणजे लाड अशी पण अनेक घरांची समजूत आहे.

या अशा गैरसमजुतीतूनच मुलांना महागड्या वस्तू आणणं म्हणजे त्यांचे सॉलिड लाड करणं, असं अनेक घरांना वाटू लागलं. मग घरात मुलांना आवश्यक व अनावश्यक असणाºया वस्तूंचा खच पडू लागला. घरांतून खेळण्यांचा महापूर आला. जितके खेळणे महाग तितके लाड अधिक असे एक चुकीचे समीकरण तयार होऊ लागले. या साºया बदलत्या जीवनशैलीमुळे बिचारी मुले त्यात भरडली जाऊ लागली. या लाडाच्या लाटेत मुलेच वाहून जाऊ लागली. त्यामुळे आता ‘मुलांचे खेळ आणि खेळणी’ याबाबतच विचार करण्याची गरज निर्माण झाली.

वेगवेगळे अनुभव अनुभवण्यासाठी मुले खेळण्यांशी खेळत असतात. मुलांना खेळण्याची किंमत नव्हे तर त्या खेळण्यापासून मिळणारा सच्चा अनुभव अधिक महत्त्वाचा असतो. मोडण्याचा, तोडण्याचा, पुन्हा जोडण्याचा, गतीचा, नवीन काही शोधण्याचा, आव्हान स्वीकारण्याचा, रचना बदलण्याचा, विध्वंस करण्याचा, आपल्या सुप्त इच्छा प्रगट करण्याचा, मालकीहक्काचा, असे अनेकानेक अनुभव मुलांना खेळण्यांपासून हवे असतात. मुलांचा आनंद हा या अनुभवावर अवलंबून असतो. म्हणून महागड्या खेळण्यापेक्षा समृद्ध अनुभव देणारे खेळणेच मुलांना आवडते. मुलांना खेळणी आणण्यासाठी लगेच बाजारात जाण्याची गरज नाही किंवा किमतीसाठी चीनवर अवलंबून राहण्याची तर अजिबातच गरज नाही. 

आज आपण घरातील वस्तूंपासून आपल्या मुलांना खेळ कसे शिकवायचे हे सांगणार आहे. आत्ता आपण जो खेळ व खेळणी शोधणार आहोत त्यापेक्षा अधिक खेळ-खेळणी तुमच्या घरात लपलेली आहेतच, ती तुम्ही मुलांच्या मदतीने शोधायची आहेत. मी सांगितलेल्या खेळात तुमच्या सोयीने तुम्ही बदल करायचे आहेत. चला पाहूयात घरच्या घरी घरातील साहित्य वापरून खेळता येणारा खेळ …

पहिल्यांदा तुम्ही स्वच्छ पांढºया काचेच्या बाटलीत काठोकाठ पाणी भरायचं आणि झाकण घट्ट लावायचं. आता वर्तमानपत्रातल्या लहान टायपातल्या मजकुरावरून जर ही बाटली आडवी फिरवली तर मजकूर मोठा दिसू लागतो. आता ती बाटली बहिर्गोल भिंग म्हणून काम करू लागते. शोधू दे मुलांना, आणखी काय करता येईल? या जादुई भिंगातून काय-काय मोठं करून पाहता येईल? एक क्लू देऊन ठेवतो, मुंगी, डास, फुलांच्या पाकळ्या इ. गोष्टी आपण मुलांसोबत याच भिंगातून पाहू शकतो.