स्क्रॅबल लहान मुलासाठी बौद्धिक खेळ

वर्तमानपात्रात अथवा साप्ताहिक मासिकात येत असलेल्या “शब्दकोड्याप्रमाणे” हा खेळ आहे. हा खेळ कमीत कमी २ जणात खेळता येतो. ह्या खेळात चौकोनी चकत्यांवर इंग्रजी अक्षरे लिहिलेली असतात व खेळ सूर करण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूस ७ चकत्या दिल्या जातात . ह्या ७ अथवा कमी चकत्या वापरून एक इंग्रजी शब्द तयार करावा लागतो. सोबत असलेल्या पटावर ह्या चकत्या शब्दकोड्याप्रमाणे “उभ्या किंवा आडव्या” पद्धतीने मांडून शब्द लिहावा लागतो.

पटावर चौकोनात चकत्या मांडल्या कि त्याखाली लिहिले गुण स्पर्धकास मिळतात. सर्व चकत्या संपल्यावर ज्याचे गुण अधिक तो स्पर्धक जिंकतो. हा खेळ खेळण्यासाठी इंग्रजी शब्दकोशाचे उत्तम ज्ञान असावे लागते. हा खेळ मुलांना शिकविल्यास त्यांना इंग्रजी वाचनाची गोडी वाटू लागते. सतत mobile अथवा laptop वर खेळ खेळण्यापेक्षा ह्या खेळाने वाचनाची गोडी लागून ज्ञानवृद्धीही होऊ शकते. हा खेळ वय वर्ष ८ व अधिकच्या मुलांसाठी योग्य आहे