बैठे खेळ व गेम करतील मुलांचे खास मनोरंजन!

लहान मुलांसाठी अनेक गेम अथवा बैठे खेळ उपलब्ध आहेत. बैठे खेळ निवडताना असेच खेळ निवडावे जे मुलांमधील सुप्त गुण विकसित होण्यास मदत करतील. लहान मुलांच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असल्याने ह्या वाढत्या वयात योग्य प्रोत्साहन दिल्यास मुले हुशार व कुशाग्र बुद्धी असलेली होतात.

हे खेळ खेळताना पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे वे खेळ नीट समजावून द्यावा तरच त्या खेळाचा उद्देश सफल होण्यास मदत होईल.

कॅरम बोर्ड – Carrom Board

हा काळ्या व पांढऱ्या सोंगट्यांचा खेळ आहे. एका सपाट लाकडाच्या गुळगुळीत board वर सोंगट्या मांडून त्या striker नावाच्या मोठया सोंगटीने मारायच्या व चार टोकांना असलेल्या छिद्रांमध्ये घालवायच्या असा हा खेळ आहे. ह्या खेळात एक लाल रंगाची “राणी” (Queen) सोंगटी पण असते. ती जो खेळाडू यशस्वीरीत्या घालवेल तो जिंकला. सोंगट्या बहुतेक वेळेला लाकडाच्या असतात परंतु striker plastic चा असू शकतो. सोंगट्या सहजपणे सरकण्यासाठी Carrom Board ची वेगळी powder मिळते.

हा खेळ कमीत कमी दोन जणांनी खेळावा लागतो. मोठ्यांच्या Carrom Board चा आकार ७४ सेंटी X ७४ सेंटी (२९ इंच X २९ इंच) एवढा असतो. लहान मुलांसाठी लहान आकाराचे Carrom Board पण मिळतात. हा खेळ बराच लोकप्रिय असून अनेक शहरांमध्ये Carrom च्या स्पर्धा पण असतात, त्यात जिंकल्यास चषक व रोख बक्षीस दिले जाते.लहान मुलांना हा खेळ शिकविल्यास त्यांची एकाग्रता वाढण्यास नक्की मदत होऊ शकते.

Striker ने सोंगटी छिद्रात घालविण्यासाठी एकाग्रता व शरीराची स्थिरता लागते. हा खेळ वय वर्ष ५ व अधिकच्या मुलांसाठी योग्य आहे.

सापशिडी – स्नेक अँड लॅडर – Snake and Ladder

हा खेळ प्राचीन भारतीय “मोक्ष पटम” ह्या खेळाचेच सुधारित स्वरूप आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे आपल्या महालात ह्या खेळाचा आनंद घेत असत. हा खेळ फासे व सोंगट्या वापरून खेळला जातो. ह्या खेळात कमीत कमी २ जण असावे लागतात.

ह्या खेळात पटावर १०आडवे व १० उभे असे १०० रकाने असतात. फासे टाकल्यावर जो आकडा वर दिसेल तेवढे रकाने सोंगटी पुढे सरकावायची असते.नवीन चौकोनात जर शिडी अली तर सोंगटी शिडीवरून वर सरकते परंतु जर नवीन चौकोनात सापाचे तोंड आले तर सापाच्या शेपटीपर्यंत खाली घसरावे लागते.

फासा टाकल्यानंतर कोणता आकडा येणार ह्याची माहिती नसल्याने खेळात साप येणार कि शिडी ह्याची उत्सुकता लागून राहते व हीच ह्या खेळाची खरी गंमत आहे.सापाने गिळल्यावर खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे हा मोठा गुण लहान मुलांना ह्या खेळातून शिकविता येतो. पुढे मोठे झाल्यावर एखाद्या वेळेस अपयश जरी आले तरीही ते सहज पचविण्याची ताकदच हा खेळ जणू देतो. हा खेळ वय वर्ष ४ व अधिकच्या मुलांसाठी योग्य आहे.

UNO- उनो, एक पत्त्यांचा खेळ

UNO हा एक पत्त्यांचा खेळ आहे परंतु हे पत्ते नेहमीचे “बदाम, इस्पिक ,चौकट व किल्वरचे” नव्हेत. ह्या खेळात एकूण ११० पत्ते पिवळ्या, हिरव्या, लाल व निळ्या रंगात असतात. हा खेळ कमीत कमी २ व जास्तीत जास्त १० जणांमध्ये खेळला जातो. हा खेळ १९७१ साली Merle Robbins नावाच्या व्यक्तीने प्रथम शोधला व कालांतराने Mattel ह्या कंपनीने तो विकत घेतला.

पत्त्यांच्या इतर खेळाप्रमाणेच ह्या खेळाचे काही नियम आहेत व हा खेळ मुलांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.कुटुंबातील सर्वांनी खेळताना लहान मुलांना सहभागी करून घेतल्यास खूपच मजा येते व एक नवीन कसब सुद्धा मुलांना शिकता येते. हा खेळ खेळण्यासाठी चातुर्य व स्मरणशक्तीचा उत्तम उपयोग करावा लागतो. हा खेळ वय वर्ष ७ व अधिकच्या मुलांसाठी योग्य आहे.

ल्युडो – Ludo

हा खेळ “पचीसी” ह्या प्राचीन भारतीय खेळाचेच सुधारित व सोप्पे स्वरूप आहे. कौरव व पांडव ह्यांच्यामध्ये महाभारताचे महायुद्ध होण्यापूर्वी हाच खेळ खेळाला गेला, ज्यात पांडवांना हार पत्करावी लागली, असा उल्लेख आहे.

हा खेळ कमीत कमी २ जणात खेळता येतो. खेळण्यासाठी फासे व सोंगट्या असतात व फासे टाकल्यावर वर आलेल्या आकड्यानुसार सोंगट्या पुढे सरकतात. पटावर दिलेल्या मार्गावारून एक फेरी जो स्पर्धक सर्वात प्रथम पूर्ण करेल तो हा खेळ जिंकतो. बहुतेक वेळा “सापशिडी” व Ludo असा खेळांचा संच विकत मिळतो व मुले हो दोन्ही खेळ आवडीने खेळतात.

हा खेळ खेळताना प्रत्येक खेळाडूं ४ सोंगट्या देण्यात येतात व चारही सोंगट्या मार्ग पूर्ण करून स्वगृही परतल्या तरच विजयी घोषित केले जाते. हा खेळ लहान मुलांना शिकविल्यास त्यांना संयम ठेवण्याची सवय लागते म्हणूनच मोठ्यानी लहान मुलांना ह्या खेळात सहभागी करून घ्यावे. हा खेळ वय वर्ष ३ व अधिकच्या मुलांसाठी योग्य आहे.

व्यापार – मोनोपोली- MonopolyMonopoly म्हणजेच “नवा व्यापार ” हा एक पाटावर खेळण्याचा खेळ आहे. हा खेळ खेळण्यासाठी कमीत कमी ४ जण लागतात व फासे व सोंगट्या वापरून खेळावा लागतो. त्याचबरोबर ह्या खेळात कागदी पैसे वाटले जातात जे वापरून खरेदी व विक्री करायची असत .

जसे फासे टाकले जातात तसे सोंगट्या पुढे सरकल्या जातात व पटावर असलेल्या इमारती अथवा स्थळे विकत घेता येतात.खेळाच्या पटावर प्रसिद्ध स्थळे, इमारती व शहरातील अथवा देशातील जागा समाविष्ठ असतात ज्या काल्पनिक पैसे वापरून विकत अथवा विकता येतात. ह्या खेळाचा उद्देश जास्तीत जास्त इमारती अथवा जागा विकत घेऊन जिंकावे हा असतो.

विकत घेतलेल्या जागा दुसऱ्या खेळाडूंना भाड्याने देऊन अधिक (काल्पनिक) पैसे कमावता येतात.हा खेळ खेळताना मुलांना सहभागी करून घेतल्यास आर्थिक व्यवहार व त्यांचे प्राथमिक ज्ञान व्हायला मदत नक्कीच होते.

ह्या जगात प्रत्येक वस्तूला किंमत आहे व ती त्या वस्तूच्या उपयोगानुसार मोजावी लागते हा खूप मोठा गुण आपण मुलांना ह्या खेळाद्वारे शिकवू शकतो. हा खेळ वय वर्ष ८ व अधिकच्या मुलांसाठी योग्य आहे.