फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीटसाठी अपार आयडीवर नोंदणी करणं बंधनकारक आहे.निकालानंतर गुणपत्रिका डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतील.
ही नोंदणी शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुलभ करेल तसंच शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देईल.
त्याशिवाय विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड आयुष्यभरासाठी सुरक्षित व एकत्रित डिजिटल स्वरूपात ठेवेल.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अपार आयडीवर नोंदणी करणे आता अनिवार्य आहे.
ही नोंदणी केल्यानंतर निकाल जाहीर झाल्यावर गुणपत्रिका थेट डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपात मिळेल. यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशाची प्रक्रिया सोपी आणि जलद होईल.
विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक दस्तऐवज – गुणपत्रिका, प्रमाणपत्रे – एकाच ठिकाणी सुरक्षितपणे जतन होतील आणि आयुष्यभर उपलब्ध राहतील.
