ऑटो टॅक्सी बस ट्रक ट्रान्सपोर्ट तीव्र आंदोलनच इशारा.

पुणे-हिट अँड रन प्रकरणी दिल्ली पंजाब बिहार उत्तर प्रदेश मध्यप्रदेश सह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय झाला असून, महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून 9 जानेवारीमध्ये रात्रीपासून हे आंदोलन तीव्र करून चक्काजाम करण्याचा निर्णय विविध संघटनेने घेतला असल्याची माहिती ऑटो टॅक्सी ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली

बाबा कांबळे यांनी दिल्ली जंतर-मंतर येथे आंदोलन केले तसेच पंजाब येथील आंदोलनात देखील सहभाग घेतला तसेच देशाच्या विविध भागात दौरा करून ते 9 तारखेला महाराष्ट्र मध्ये मध्यरात्रीपासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्र मध्ये घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केला जाणार आहे यामध्ये ऑटो टॅक्सी ट्रक बस टेम्पो सर्व प्रकारचे ड्रायव्हर चालक-मालक सहभागी होणार आहेत.

बाबा कांबळे म्हणाले देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे परंतु सरकार मात्र भूमिकेवरती ठाम आहे, केंद्र सरकारने देशभरातील 25 करोड ड्रायव्हर चालकांचे संघटनांसोबत चर्चा करावी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलास हे आंदोलन अधिक आक्रमक होईल, ‘शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवा .

कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन करू नये शांततेच्या मार्गाने परंतु अधिक आक्रमक व तीव्र आंदोलन करून जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय वार्ड कार्यालय समोर आंदोलन करा तसेच चक्काजाम देखील करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे असे आवाहन बाबा कांबळे यांनी महाराष्ट्रातील सर्व चालक मालकांना केले आहे.