मित्रानो, जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त वाट पाहिली जाते ती मकरसंक्रांतीची आणि त्यातही तिळगूळ खाण्याची. तीळगूळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत या सणाचा गोडवा द्विगुणित केला जातो.
मकरसंक्रांत आणि तिळाचं नातं खूपच महत्त्वाचं आहे. सफेद, काळे आणि चॉकलेटी रंगाचे तिळ हे आपल्या जेवणाच्या वापरात असतातच. तिळामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. विविध रोगांपासून दूर राहण्यासाठी तिळाचा वापर करून घेता येतो.
इतकंच नाही तर तिळाच्या तेलाने त्वचा आणि केसांनाही फायदा मिळतो. तीळ खाल्ल्याने शरीरामध्ये उर्जा निर्माण होते आणि थंडीपासूनही संरक्षण होते आणि याच कारणासाठी मकरसंक्रांतीच्या सणाला तिळाचे लाडू केले जातात आणि वाटण्यात येतात. आज आपण तिळाचे आरोग्यदायी फायदे समजून घेऊया.
तीळ हा सर्वात चांगला शाकाहार समजण्यात येतो. कारण प्रोटीनचा सर्वात चांगला स्रोत हा मानला जातो. वास्तविक, प्रोटीन एक महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे, जे आपल्या मांसपेशी आणि हाडांसाठी योग्य ठरते. तसंच शरीराला उर्जा देण्याचेही काम करते.
इतकंच नाही तर तीळ वजन नियंत्रणासाठीही फायदेशीर ठरतात. जानेवारीत असणाऱ्या थंडीत तिळाचे लाडू शरीरात उर्जा निर्माण करून थंडीपासून संरक्षण करण्याचे काम करतात.
तीळ मधुमेहाच्या रूग्णांसाठी हृदयासंबंधित समस्या सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याशिवाय तीळ शरीरामध्ये इन्शुलिनचा स्तर नियंत्रित करण्यासाठीही मदत करतात. यामुळे मधुमेहाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते आणि मधुमेह आटोक्यात राहतो.
हृदयाची काळजी घेण्यासाठी तिळाचे सेवन लाभदायक ठरू शकते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत मिळते.
तिळामध्ये अनेक औषधीय गुण आहेत. तिळातील आढळणारे अँटी-कॅन्सर आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण हे कॅन्सरच्या धोक्यापासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरतात.
तिळाचे हे वरील आरोग्यदायी फायदे लक्षात घेऊन तुम्ही यावर्षी तिळगूळ खावा. मकरसंक्रांतीला तिळगूळ का खायचा असे प्रश्न जर मनात असतील तर या लेखातून तुम्हाला नक्कीच त्याचे उत्तर मिळाले असेल.