आटपाडी तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके ढगाळ वातावरणाने धोक्यात

गेल्या काही दिवसापासून अचानक झालेल्या हवामानातील बदलाच्या परिणामाने रब्बी हंगामातील पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे आटपाडी तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. यातच अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आटपाडी तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली असून यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये गहू क्षेत्रात निम्म्याने घट होऊन ज्वारी व हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गुलाबी थंडी अन् प्रखर सूर्यप्रकाशामुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण होते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात होत असल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.

तर ढगाळ वातावरण झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रब्बी हंगामात तालुक्यात ज्वारी १० हजार ७६७ हेक्टर, गहू ५७८ हेक्टर, हरभरा ६१८ हेक्टर, मका २१८८० हेक्टर, तेल बिया ४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये गहू व मक्याच्या पिकामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानाने पिकांवर झालेला रोगांचा प्रादुर्भाव पडलेल्या रोगांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.