आज खानापुरात विद्यापीठ उपकेंद्राची होणार जागा पाहणी…..

खानापूर येथील शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी जागा पाहणी साठी आज मंगळवारी अध्यक्ष डॉ. प्राचार्य व्ही. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती येणार असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य आणि उपकेंद्र समिती सदस्य वैभव पाटील यांनी दिली.

खानापूर येथील जागेची पाहणी करून तेथे उपलब्ध परिसर आणि जागेनुसार विद्यापीठातील किती विभाग उपकेंद्र म्हणून सुरू करता येतील याचा प्रस्ताव तसेच त्यासाठी लागणारे आर्थिक अंदाजपत्रक याची पूर्तता करून शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती समोर ठेवावी असे पाटील यांनी मंगळवारी येणाऱ्या दहा सदस्यांच्या समितीला सांगितले आहे.

त्यानंतर 19 जानेवारीच्या मॅनेजमेंट कौन्सिल सभेमध्ये हा विषय मंजुरीसाठी ठेवावा आणि तो तात्काळ शासनाकडे सादर करावा असे ठरल्याचे पाटील यांनी सांगितले.