सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखीचा आहे. सांगोल्यातील पाणी प्रश्न खूपच मोठा आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तर सांगोल्यातील 19 वंचित गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त असणाऱ्या आठ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला हिवाळी अधिवेशनामध्ये मंजुरी मिळालेली आहे.
ही माहिती आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे. गेली चार वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास भरघोस यश आलेले आहे. त्यामुळे या गावांना खूपच मोठा लाभ होणार असून मान नदी बारमाही भरलेली असणार आहे असे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले आहे.
मान नदीवरील सुमारे वीस गावांना नव्याने मंजूर झालेल्या 0.600 एमसीएफटी पाण्याचा मोठा लाभ होणार असून वर्षातून तीन वेळा मान नदीवरील सर्व बंधारे भरण्यात येणार असल्याने या पुढील काळामध्ये मान नदी ही बारमाही भरलेली असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.