लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपले मोर्चे बांधणी करत आहेत.अनेक हालचाली अनेक पक्षातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तर सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला सोडण्याचा निर्णय झाल्याचे समजते.काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), खासदार शरद पवार आदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
दरम्यान, हातकणंगलेची जागा स्वाभिमानी पक्षाला गेल्याने कोल्हापूरच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा हक्क कायम असून ही जागा ठाकरे गटाला दिल्यास उमेदवार कोण याविषयी मात्र संभ्रमावस्था कायम आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत काल दिल्लीत राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत यावर प्राथमिक चर्चा झाली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट, पवार गट व काँग्रेसकडेही ताकदीचा उमेदवार नाही. ही बाब गृहित धरून ही जागा श्री. शेट्टी यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय झाला. आजची बैठक ही प्राथमिक बैठक होती.
या प्रस्तावाला शेट्टी यांचा होकार आहे का नाही हे समजल्यानंतर पुढील गोष्टी शक्य आहेत. सातारा लोकसभा पुन्हा एकदा खासदार श्रीनिवास पाटील हेच उमेदवार असतील असे संकेतही मिळत आहेत.