राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा! ‘या’ राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

आयोध्येत सोमवारी २२ जानेवरीला होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह देशभर दिसून येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारने शैक्षणिक संस्थांसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व शैक्षणिक संस्थांना सोमवारी २२ जानेवारीला सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान या दिवशी राज्यात दारूची दुकाने बंद राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.