जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दराने आज ऐतिहासिक उसळी घेतली आहे. 24 तासांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळीच मार्केट उघडताच सोन्याचे दर 1,80,000 रुपयांवर पोहचले आहे. तर चांदीच्या दराने चार लाखांचा आकडा पार केला आहे. या वाढीमुळे ज्वेलर्स आणि खरेदीदारांचे लक्ष सोन्या-चांदीच्या बाजारावर अधिक वाढले आहे. जागतिक बाजारातील चलनवाढ, डॉलरच्या किंमतीत बदल, आणि मागणी-पुरवठ्याचे संतुलन हे या वाढीचे कारण आहे. त्याचबरोबर अनेक देशांमधील नागरिक हे सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. याचाच परिणाम हा सोने आणि चांदीच्या भावावर होतोय. व्यासायिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, परंतु ज्यांच्याकडे लग्न आहेत त्यांच्यासाठी ही चिंता वाढवणारी बाब असून त्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. पुढील काही दिवसांत सोने, चांदीच्या भावात अजून बदल होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे.
Related Posts
TET: टीईटी नापास गुरुजींना मोठा झटका! पदोन्नती विसरून जा, हायकोर्टाचा आदेश काय?
टीईटी पास नसलेल्या अपात्र शिक्षकांना हायकोर्टात मोठा झटका बसला आहे. शिक्षकांच्या पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याच्या याचिकांमध्ये टीईटी अर्हता निर्णायक…
Maharashtra Weather Update : महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल
राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आणि मुंबईत उन्हाच्या झळा अधिक लागणार आहे. तर दुसरीकडे…
लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. योजनेचा मासिक हप्ता न थांबता सुरू…
