आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी आधार कार्डची गरज भासते. आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी काम होणे शक्य नसते. तसेच केवळ सरकारीच नव्हे तर बँक, शाळा, महाविद्यालय इतकंच काय तर प्रवासाठीही आधार कार्ड महत्वाची भूमिका पार पाडते.
आधार कार्ड काढण्यासाठी ज्या व्यक्तीचे आधार कार्ड काढायचे आहे ती प्रत्यक्ष तिथे उपस्थित लागते. तसेच त्या व्यक्तीचे बायोमॅट्रिक लागते. परंतु आता याची गरज भासणार नाही.
अनेकदा अनेक जणांच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे आपले बायोमॅट्रिक काम करत नाही आणि अश्यावेळीच आधार कार्डशी संबंधित गोष्टीचे काम पडते. त्यामुळे अशी समस्या उद्भवू नये यासाठी केंद्र सरकारने बायोमॅट्रिक शिवाय आणि डोळ्यांच्या स्कॅनींग शिवाय आधार कार्ड बनवता येण्याची घोषणा केली आहे.
असे आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला वैध वैद्यकीय कारण द्यावे लागणार आहे आणि विना बायोमॅट्रिकचे आधार कार्ड मिळवता येणार आहे. आत्तापर्यंत तब्बल 29 लाख लोकांनी बायोमॅट्रिक शिवाय आधार कार्ड बनवून घेतल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
विना बायोमॅट्रिक शिवाय आणि डोळ्यांच्या स्कॅनींग शिवाय आधार कार्ड बनवून घेण्यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, लिंग, पत्ता आणि तारखेनुसार आधारकार्डसाठी अर्ज भरावा लागणार आहे. तसेच जर हात आणि डोळे सक्षम नसतील तर त्याचेही प्रमाणपत्र अर्जाला जोडावे लागणार आहे. तसेच अपंगत्वाचा फोटो या आधार कार्डला जोडावे लागणार आहे.
अनेकदा बोटांचे ठसे किंवा डोळ्याचे आजार असलेल्या लोकांचे आधार कार्ड काढतांना त्रास होतो. बोटांचे ठसे अस्पष्ट येतात त्यामुळे आधार कार्ड निघत नाही. अश्या अपंग व्यक्तीला आधार केंद्रावर विना फिंगर प्रिंट आणि डोळयांच्या स्कॅनींग शिवाय आधार कार्ड काढून देण्यासाठी आधार केंद्राला केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत.
आपले आधार कार्ड आपल्या मोबाईलला लिंक करण्यासाठी तसेच ते अपडेट करण्यासाठी पैसे भरून काम करून घ्यावे लागते. परंतु 14 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या कालावधीपर्यंत माय आधार पोर्टलवर आधार तपशील अपडेट करण्याची मोफत सुविधा उपलब्ध होती.
आता त्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मोफत आधार अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. परंतु ही प्रक्रिया ऑनलाईनवरच उपलब्ध आहे. जर आधार केंद्रावर तुम्ही गेलात तर तुम्हाला 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.