पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ॲक्शन मोडवर….

महाराष्ट्र पोलीस महासंचालकाचा अतिरिक्त पदभार असलेले मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला आहे. राज्याच्या या पहिल्याच महिला पोलीस महासंचालक आहेत.

रश्मी शुक्ला यांनी सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख म्हणून काम केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी यांनी आपल्या कामाचे काही लक्ष्य ठेवले आहे. कायदा व सुव्यवस्था महिला सुरक्षा प्राथमिकतेवर असेल सायबर गुन्हेगारी कमी करण्याकडे देखील मी लक्ष देणार तसेच महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी काम करणार असल्याचं रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारताना आपले मनोगत व्यक्त केले.