सगळेजणच २२ जानेवारीची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पूर्णजगात सध्या अयोध्या येथील श्री राम मंदिराची चर्चा आहे. तेथील धार्मीक कार्यक्रमाविषयी सर्वांनाच आतुरता आहे.
आयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती हुपरी येथे उभारण्यात आली आहे.लाकडापासून बनवलेली ही प्रतिकृती कोल्हापूरसह ३०० गावांत मार्गक्रमण करणार आहे. २५० किलोमीटर प्रवास होणार असून भक्तांना याच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बाबा घोरपडे यांच्या माध्यमातून व डॉक्टर संगीता निंबाळकर यांच्या संकल्पनेतून आयोध्यातील श्रीराम प्रभू यांच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती हुपरी तालुका हातकंणगले येथील शामराव संतू लोहार यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तयार केली आहे. २० दिवसाच्या अथक प्रयत्नातून ही प्रतिकृती बनलेली आहे. या मंदिराकडे पाहताना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन झाल्याचा अनुभव येतो.