सगळीकडेच गावोगावी गल्लोगल्ली चर्चा आहेत त्या म्हणजे गन्हेगारी म्हणजेच खून, मारामारी, चोरी, फसवणूक…… तसेच अनेक अवैध्य धंदे देखील राजेरोसपणे सुरु आहेतच. याना पोलिसांची देखील वचक नाही. पण चक्क पोलीस असल्याची बतावणी देत तोतया पोलिसांकडून दीड लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आलेली आहे. झेले हे चंदूर गावचे रहिवासी आहेत ते इंगळी मार्गे अॅक्टिव्हा मोपेडवरून हुपरीकडे येत होते.
या दरम्यान बाजूला मोटरसायकलवरून थांबवून रस्त्यावर दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी पोलिस असल्याचे भासवून त्यांना अडवून मारहाण करीत अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला आहे.चोरट्यांनी तोंड झाकल्यामुळे ओळखता आले नाही. यापुर्वी डोळ्यात चटणीची पूड टाकून वाटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. कालांतराने या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.
मात्र, पुन्हा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मच्छिंद्रनाथ दादा पाटील (रा. ऐनापूरे मळा चंदूर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून १ लाख ६० हजार रुपयांहून अधिक सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. शिवपूजा बझारमधून गल्ल्यातील काही रक्कम व खाऊचे पदार्थ लंपास केले आहेत तर यशवंत नगर मध्ये चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला आहे. या घटनांमुळे नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे.