लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची अपडेट ! खात्यात थेट ६००० जमा होणार? रखडलेल्या ४ हप्त्यांची रक्कम एकत्रच मिळणार

राज्यातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.(update)जानेवारीचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर २०२५ पासून पैसे रखडले आहेत. हे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका, जसे की चुकीचे पर्याय निवडणे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे लाभार्थींचे हप्ते रोखले गेले असल्याची माहिती आहे.

कदा e-KYC दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर (update)डिसेंबर २०२५, जानेवारी २०२६ आणि फेब्रुवारी २०२६ किंवा मार्चपर्यंत चे हप्ते प्रति महिना ₹१,५०० एकत्रित उदा. ₹४,५०० किंवा ₹ ६००० जमा होण्याची शक्यता आहे, . मात्र, याबाबत अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्याआचारसंहितेमुळे जसे की महानगरपालिका निवडणुका विलंब झाला होता, पण आता DBT द्वारे पेमेंट सुरू होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र सरकारने ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की, ज्या लाभार्थ्यांनी e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला किंवा त्रुटी झाली, त्यांना ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन दुरुस्ती करता येईल. ही शेवटची संधी आहे – त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.कशी कराल ई -केवायसी दुरुस्ती?
त्वरित ladakibahin.maharashtra.gov.in वर जा.
ई-केवायसी सेक्शनमध्ये लॉगिन करा आधार/मोबाइल (update)नंबर वापरा.
चुकीची माहिती उदा. कुटुंबातील सरकारी नोकरी, उत्पन्न इ. दुरुस्त करा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.दुरुस्तीनंतर तालुका स्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे जमा होतील.