Google Trends मध्ये PM Kisan e-KYC सर्वाधिक वेळा सर्च, आनंदवार्ता येणार?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची सध्या चर्चा आणि तितकीच प्रतिक्षा आहे. हा हप्ता कधी जमा होणार याविषयी शेतकर्‍यांची उत्सुकता ताणल्या गेली. सध्या गुगल ट्रेंडसमध्ये पीएम किसानचा सर्वाधिक वेळा शोध घेण्यात आल्याचे समोर येत आहे. गुगल ट्रेंड्सनुसार, गेल्या आठवड्यात PM Kisan e-KYC हा कीवर्ड सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आला आहे. त्यामुळे हा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

PM Kisan Yojana मध्ये 6,000 रुपये खात्यात

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत केंद्र सरकार दरवर्षी शेतकर्‍यांच्या खात्यात 6,000 रुपये जमा करते. थेट हस्तांतरण पद्धतीने ही रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येते. ही रक्कम तीन टप्प्यात देण्यात येते. म्हणजे 2,000 रुपयांचा प्रत्येक हप्ता देण्यात येतो. पुढील हप्त्यापूर्वी ई-केवायसी आणि काही राज्यात फार्मर आयडी असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

PM Kisan e-KYC कसे करणार?

सर्वात अगोदर PM Kisan साईटवर जा

लॉगिन केल्यावर e-KYC पर्यायावर क्लिक करा

आता आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका

आता ‘Search’ वर क्लिक करा

नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका, त्यानंतर OTP टाका

OTP टाकून आता व्हेरिफिकेशन पूर्ण करा

व्हेरिफिकेशननंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मॅसेज येईल

Farmer ID कसे तयार करणार?

AgriStack पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा

अगोदर नोंदणी करा , आधाराच्या माध्यमातून e-KYC प्रक्रिया पूर्ण करा

सर्व योग्य माहिती भरा आणि कागदपत्रं अपलोड करा

व्हेरिफिकेशननंतर एक युनिक फार्मर आयडी देण्यात येईल

सरकार अनेक ठिकाणी फार्मर आयडीसाठी शिबिर घेत आहे

पीएम किसान योजनेचा 22वा आठवडा कधी?

पीएम किसान योजनेचा मागील हप्ता हा ऑक्टोबर 2025 मध्ये देण्यात आला होता. पुढील आठवडा लवकरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारणपणे प्रत्येक 4 महिन्यांच्या अंतराने हप्ता देण्यात येतो. त्यामुळे हा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. मार्च महिन्यात पुढील हप्ता येण्याची आणि शेतकर्‍यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा हेण्याची शक्यता आहे.