विटा येथे आ. पडळकर यांच्या जीवनावरील ‘अस्वस्थ नायक’ या कादंबरीचे झाले प्रकाशन

विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवनावर आधारित “अस्वस्थ नायक” या कादंबरीचे लेखक आनंदा टकले यांनी केले आहे. हा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अस्वस्थ नायक ही कादंबरी आ. गोपीचंद पडळकर यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी आहे. पुस्तक प्रकाशन समारंभास आ. गोपीचंद पडळकर, त्यांच्या आई हिरानानी पडळकर, डॉ. मुरहरी केळे, डॉ. रोहिणी तुकदेव, ग्रामीण साहित्यिक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. गोपीचंद पडळकर यांच्या कुटुंबीयांच्यावतीने लेखक आनंदा टकले यांचा मोट्या प्रेमाने आणि कौतुकाने सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ मुरहरी केळे म्हणाले की, अस्वस्थ नायक ही कांदबरी सामाजिक, राजकीय क्षेत्रात नवा प्रकाश टाकणारी, ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करणारी कादंबरी आहे. डॉ रोहिणी तुकदेव म्हणाल्या, अस्वस्थ नायक कादंबरी ही राजकीय धगधगत्या दुष्काळ संपवणार्या नायकाची ही कहाणी आहे. यावेळी आ. गोपीचंद पडळकर म्हणाले की, माझ्या जीवनातील महत्वाच्या घटनांच्या आधारे लेखकाने वास्तवावर आधारित गावगाड्यातील नायक साकारला आहे. ही कांदबरी साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल. यावेळी माजी महापौर नितीन सावगावे, तात्यासाहेब गडदे, विजयराव गावडे, माजी समाज कल्याण सभापती सदाभाऊ खाडे, संदिप ठोंबरे, नगरसेवक विष्णू माने, सविता मदने, माजी सभापती पूनम कोळी यांच्यासह मायाक्का बिरूदेव चॅरिटेबल ट्रस्ट बिसूर परिसरातील सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.