कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीमध्ये प्रदुषण झाल्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून नदीला मलयुक्त व रसायनमिश्रित सांडपाणी येत आहे.त्यामुळे पाण्याला गढूळ, काळेकुट्ट रंग आला असून, उग्र वास येत आहे.
पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे तडफडन मत्य पावत आहेत. त्यामुळे सुज्ञ नागरिकांच्या तक्रारीमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांनी तेरवाड बंधारा येथे पाहणी करुन दूषित पाण्याचे नमुने घेतले.शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा ते शिरढोण पुलापर्यंत पक्ष्यांचे थवे माशांना खाण्यासाठी येत आहेत.
दरम्यान याप्रकरणी दुषित पाण्याची पाहणी करण्यासाठी शिरोळ तालुक्यात आलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे यांनी दुषित पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला. तर, मच्छिमार करणाऱ्या बागडी समाजाने चांगलेच धारेवर धरत नदी प्रदुषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अधिकारी हरबड यांनी दुषित पाण्याचे नमुने घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले.