इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न जगजाहीर आहे. इचलकरंजी शहरात मंजूर असलेली सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरता गेल्या 14 महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने इचलकरंजी नागरी मंचच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. गांधी पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात होऊन मुख्य मार्गावरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून शासनाचा निषेध केला.
इचलकरंजी शहरात पाणी मागणाऱ्यावर गुन्हे नोंद करणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंचावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला शहरासाठी मंजूर असलेल्या पाणी योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी अन्यथा आंदोलन तीव्र करून मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी जनजागृती करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना देण्यात आले.