अर्थमंत्री १ फेब्रुवारीला सादर करणार आपलं सहावं बजेट ….

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर करणार आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. एप्रिल-मेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन होणारं नवीन सरकार २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.

निर्मला सीतारामन यांचा हा सहावा अर्थसंकल्प असेल.५ जुलै २०१९ रोजी त्यांनी पहिल्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. २०१९-२० या आर्थिक वर्षाचा हा पूर्ण अर्थसंकल्प होता. त्या वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

१ एप्रिल रोजी पीयूषगोयल यांनी तो सादर केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारामन यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.