कोल्हापूर ते कोकणला जोडणारा करुळ घाट रस्त्याच्या कामासाठी सोमवार पासून बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून, हा घाट 31 मार्चपर्यंत पूर्ण बंद राहणार आहे.
भुईबावडा घाटमार्गे केवळ प्रवासी वाहतूक तर महामार्गावरील अवजड वाहतूक फोंडा आणि अणुस्करा घाटमार्गे सुरू ठेवण्यात येणार आहे.कोल्हापूरमधून गोव्याला येण्यासाठी गगनबावडामार्ग सोयीचा असल्याने या मार्गावर अनेकांची गर्दी असते. मात्र करुळ घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने.
हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.करुळ घाटातील रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक करणे अशक्य आहे. करुळ घाट दोन जानेवारीपासून पूर्ण बंद ठेवण्यास जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी परवानगी दिली आहे. हा मार्ग 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
फक्त प्रवासी वाहतूकीसाठी
तळेरे-भुईबावडा-गगनबावडा-कळे-कोल्हापूर: अंतर 107 किलोमीटर
अवजड वाहतूकीसाठी
तळेरे-फोंडाघाट-राधानगरी-ठिकपुर्ली-कळंबा-कोल्हापूर: अंतर 123 किलोमीटर
तळेरे-वैभववाडी-उंबर्डे-तळवडे-अनुस्करा-वाघव-केर्ले-कोल्हापूर: अंतर 128 किलोमीटर