केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे ८ ऑगस्टला नाट्यगृहाला आग लागली होती. आगीमध्ये नाट्यगृह जळून खाक झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सकाळी कोल्हापुरातील आगीत बेचिराख झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली.
शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहाची पाहणी केली होती.कोल्हापूरचे थोर कलावंत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ‘केशवराव भोसले नाट्यगृहाला’ लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे.
हे नुकसान लवकरात लवकर भरून काढून ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी करण्यासाठी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन, असे अश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. नाट्यगृहाच्या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.