प्रत्येकजण हा २२ जानेवारीची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राममंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी 8000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी संपूर्ण अयोध्या शहर भव्य शैलीत सजवण्यात येणार आहे. दरम्यान आजपासून (17 जानेवारी 2024) अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज नव्या मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचेल, तर उद्या (18 जानेवारी 2024) मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.
अयोध्येत आज ऐतिहासिक दिवस असून रामलल्लांच्या मूर्तीचं अयोध्येतल्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे. मूर्तिकार अरुण योगीराज यांनी ही रामाची मूर्ती साकारलीय. ज्याची प्रतिक्षा रामभक्तांना कित्येक वर्षांपासून होती तो दिवस आज उगवलाय. रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचेल. तर उद्या मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे. तसेच श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीमुळे 20 आणि 21 जानेवारीला रामलल्लाचे दर्शन बंद राहणार आहे.
रामलल्लाच्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सर्व नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे. सर्व जलकुंभ अयोध्येत पोहोचले आहेत. मंदिराच्या गाभार्यात तीन मूर्ती ठेवण्याची तयारी केली होती. त्यापैकी कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांच्या शिल्पाची निवड करण्यात आली. राम मंदिराचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतंय.