मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील राज्याच्या दौऱ्यावर असतानाच दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजी नगरमध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी आपण त्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचे जाहीर केलं आहे. ४ जूनपासून जालन्यात आमरण उपोषणाला बसणार असून, 8 मे रोजी शेजारील बीड जिल्ह्यातही मोठा मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.