इचलकरंजीत उद्यापासून वार्डाप्रमाणे राबविली जाणार महास्वच्छता मोहीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये महास्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केलेले आहे आणि त्याच अनुषंगाने इचलकरंजीत उद्या महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने उद्या गुरुवार दिनांक 18 जानेवारी रोजी एक ते 26 प्रशासकीय वार्डामध्ये आरोग्य विभागाच्या ए, बी, सी आणि डी झोननिहाय महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानामध्ये भागातील रस्ते, फुटपाथ, बगीचे, गटार, मार्केट परिसर, मैदाने, सार्वजनिक शौचालय, शाळांचा परिसर, सर्व खुल्या जागा यांची स्वच्छता केली जाणार आहे.

उद्या गुरुवारी सकाळी 6:45 ते 10 या वेळेत हे महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियानामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासह सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत.

तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला बचत गट, युवा व क्रीडा मंडळ व नागरिक यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी केलेले आहे.