राज्य शासनाच्या दुग्ध आणि पशुसंवर्धन खात्याने यंदा जानेवारी आणि फेब्रुवारीमधील उत्पादित गाय दुधाला अनुदान स्वरूपात प्रतिलिटर 5 रुपये देण्याची घोषणा केली.थेट दूध उत्पादकाच्या बँक खात्यात अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे.
यासाठी केवायसी आधारित नियमित कागदपत्रांसह पशुधनाची इत्यंभूत माहिती देणारे एअर टॅगिंगची (कानातील बिल्ला) अट बंधनकारक करण्यात आली आहे. याचाच अर्थ, एअर टॅगिंग नसल्यास संबंधित दूध उत्पादकाला अनुदानाचा लाभ मिळणार नाही.