Tractor Anudan Yojana 2024 : शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान! असा करा अर्ज

आज आपण सदर लेखातून ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शासन राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान देते. आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी पारंपारिक शेती करताना त्यांना खूप कष्ट करावे लागत असते. कारण यंत्र खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पूरेसे भांडवल नसते. म्हणून शासनाने या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्याचे ठरवले आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच कृषी यंत्रणा खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून अवजार मिळवण्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून जर एक यंत्र खरेदी केले तर पुढील 10 वर्ष या योजनेच्या माध्यमातून आपणास अनुदान दिले जात नाही.

किती अनुदान
ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये किंवा 50% एवढे अनुदान दिले जाते व इतर अवजारे खरेदी करण्यासाठी देखील निश्चित केलेले अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून 112 कोटी इतका निधी निश्चित करण्यात आलेला आहे. हा निधी महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होणार आहे व सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज भरू शकतात.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे

कोण कोणत्या यंत्रांना अनुदान

ट्रॅक्टर
पावर टिलर
बैल चलित अवजारे
मनुष्य चलित अवजारे
प्रक्रिया संच
काढणी पश्चात तंत्रज्ञान
फलोत्पादन यंत्र
वैशिष्ट्यपूर्ण यंत्रे
स्वयंचलित यंत्रे

आवश्यक कागदपत्रे-

आधार कार्ड
7/12 उतारा
8 अ उतारा
मोबाईल नंबर
पासपोर्ट साईज फोटो
ई-मेल आयडी
अवजाराचे कोटेशन व तपासणी अहवाल
जातीचा दाखला (अनुसूचित जाती व जमाती असल्यास)
स्वयंघोषणा पत्र
पूर्व संमती पत्र

अर्ज कसा करावा?

महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करावा. तसेच आपण आपल्या जवळील सीएससी सेंटरमध्ये देखील जाऊन या योजनेचा अर्ज करू शकता.

  • अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याकरिता शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागणार आहे.
  • अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर होम पेज ओपन होईल त्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे
  • आता तुमच्या समोर दुसरे पेज ओपन होईल यामध्ये विचारलेले संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी पासवर्ड भरावा लागेल
  • आता तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे
  • यानंतर लॉगिन या ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे
  • लॉगिन झाल्यानंतर माय स्कीम या ऑप्शन वरती क्लिक करावे
  • यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे
  • आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल यामध्ये विचारलेली माहिती भरा आणि आपला बटणावर क्लिक करा
  • पुढे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे माहिती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • अशा प्रकारे तुमची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.