हिवाळ्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भारतात भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच हिवाळ्यात या भाजीपाला पिकांना बाजारात मागणी देखील जास्त असते. मागणी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना नफा देखील जास्त मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिवाळ्यात भाजीपाला पिकांची लागवड केली पाहिजे. हिवाळ्यात तुम्ही कोणत्या भाज्या किंवा फळे तुमच्या बागेत लावू शकता हे पाहू.

टोमॅटो
सूर्यप्रकाशात असलेल्या ओलसर जमिनीत टोमॅटोच्या बिया पेरून तुमच्या बागेत ताजे टोमॅटो वाढवू शकता. तसेच या झाडांना फार कमी पाण्याची गरज असते.
मोहरी
जमिनीत किंवा कुंडीत मोहरी पेरून हिवाळ्यात मोहरीची लागवड सहज करता येते.हे वाढायला २ ते ३ आठवडे लागतात आणि ती तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे.

डाळिंब
हिवाळ्यात सूर्यप्रकाशासह सुपीक जमिनीत डाळिंबाच्या बिया पेरून तुम्ही तुमच्या बागेत डाळींबाची लागवड करू शकता.
कांदा (कांद्याची पात)
जमिनीत लहान कांदा पेरून तुम्ही तुमच्या घरच्या बागेत कांदा (स्प्रिंग ओनियन्स) लावू शकता.पण, त्यांना दररोज पाणी घाला. कारण कारण – ते चांगल्या सुपीक जमिनीत जलद वाढतात.

वांगी
हिवाळ्यात वांग्याची लागवड करणे चांगले आहे. पुसा पर्पल क्लॉन्ग, पूजा क्रांती, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा अनमोल, अन्नामलाई, मुक्तकेशी या वांग्याच्या सुधारित जाती आहेत.

मुळा
हिवाळ्याच्या काळात मुळ्याची वाढ झपाट्याने होते. जपानी व्हाईट, पुसा चेतकी, बॉम्बे रेड, पुसा रेशमी, जौनपुरी, पंजाब एजेटी या मुळ्याच्या सुधारित जाती आहेत.
