इचलकरंजीत श्री बनशंकरी देवी उत्सवास प्रारंभ!


सगळीकडे आता सण यात्रा यांची रेलचेल सुरु आहे. तर श्री देवांग समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री बनशंकरी देवीचा उत्सव सप्ताह गुरुवार ता. १८ जानेवारी ते गुरुवार २५ जानेवारी २०२४ अखेर, मंगळवार पेठ येथील श्री चौंडेश्वरी मंदिरात साजरा होत आहे. या उत्सव सप्ताहाचा शुभारंभ उद्योगपती श्री. शैलेंद्र शंकरराव सातपुते यांचे हस्ते ध्वजारोहन होऊन श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ झाला. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.


या उत्सव सप्ताहामध्ये दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत सामुदायिक श्री ज्ञानेश्वर पारायण ह.भ.प. श्री. सदाशिवराव उपासे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. तसेच ३.३० ते ५.३० या वेळेत श्री शाकंभरी देवी महात्म्य वाचन, श्री देवी सहस्त्र नामावली, चौंडेश्वरी कला परिवार यांचे भावगीत भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न होत आहे. तसेच श्री चौंडेश्वरी महिला भजनी मंडळ, श्री हरिप्रिया महिला भजनी मंडळ यांची भजने होणार आहेत. त्याचप्रमाणे प्रा. गितांजली शरदचंद्र साळुंखे, श्री राजेंद नारायण पोळ यांचे व्याख्यान होणार असून, प पु. श्री. मल्लिकार्जुन स्वामी भोजकर (महाराज) भोज, यांचे प्रवचन होणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले आहे.


तसेच शनिवार ता. २० रोजी दुपारी ४.३० वाजता महाभिषेक मानाची बोली बोलण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे. तसेच जलकुंभ मिरवणुकीमध्ये सहभागी महिलांमधून लकी ड्रॉ द्वारे ११ भाग्यवान महिलांना देवीची साडी प्रसाद म्हणून मिळेल व ९ महिलांना सुवासिनीचा मान मिळेल. उत्सवाच्या प्रमुख दिवशी गुरुवार ता. २५ रोजी सकाळी ६.०० वाजलेपासून महिलांना नदीतिरी जाणेसाठी गांधी पुतळा चौकातून गाड्यांची सोय केली आहे. सकाळी ७.०० वाजता मरगुबाई मंदिरापासून गंगाजलकुंभ मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीस जलकुंभ घेऊन येणाऱ्या महिलांना चौंडेश्वरी युवा फौंडेशनच्या वतीने नदी घाटावर चहा व नाष्टाची सोय केली आहे. सदर उत्सव सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमास सर्वांनी सक्रिय सहभागी होऊन या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवांग समाजाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ मुसळे व श्री
बनशंकरी देवी उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. संगिता धुत्रे यांनी केले आहे.


सदर सप्ताहास चौंडेश्वरी युवा फौंडेशन, चौंडेश्वरी युवती फौंडेशन, चौंडेश्वरी महिला मंडळ व चौंडेश्वरी महिला पतसंस्था यांचे सहकार्य लाभले. उत्सव सप्ताह शुभारंभास देवांग समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांगले, सेक्रेटरी मधुकर वरुटे, विश्वस्त – मोहन सातपुते, रविंद्र लांडगे, सुमंत बुगड, पंडीत ढवळे, ज्ञानेश्वर सोकाशे, बालमुकुंद व्हनुंगरे, मुरलीधर निमणकर, मनोहर मुसळे, व श्रीनिवास सातपुते, श्रीनिवास फाटक, संजय सातपुते, मनोज खेतमर, कुमार कबाडे, धोंडीराम सातपुते श्रीमती शांता कोष्टी सौ. प्रिया हावळ, सौ. दिपा सातपुते, सौ. स्मिता सातपुते, सौ. विद्या मुसळे, सौ. लता लांडगे, सौ. शिल्पा गांजवे, श्रीमती. प्रिती बुगड, सौ. अनिता बारवाडे व आदी मान्यवर भाविक उपस्थित होते.