आपल्या सर्वांना माहितच आहे कि अलीकडे खूपच वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे. युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. हल्ली करिअर, नोकरी या संकल्पनांना अधिक महत्त्व आले आहे. स्पर्धात्मक युगामध्ये आई होणे हा प्रगतीमध्ये अडथळा मानला जाऊ लागला आहे. अनेक महिलांमध्ये नोकरी, करिअर की मूल असे द्वंद पाहावयास मिळते. गर्भनिरोधक साधनांचाही वापर केला जातो; नोकरी, करिअरसाठी म्हणून कोणत्याही महिलेला आता गर्भपात करता येणार नाही. शासनाने गर्भपातासाठी जी कारणे ठरवून दिली आहेत तशी कारणे असल्यासच गर्भपातासाठी परवानगी दिली जाते. वरील कारणांमुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ३०९ महिलांचे गर्भपात केले आहेत.
२४ आठवड्यांपर्यंत वैद्यकीय गर्भपात करण्यासाठी खालील कारणांसाठी परवानगी दिली जाते.
सोनाग्राफीनुसार अर्भकास व्यंग असेल तर
पीडितेवर बलात्कार झाला असेल आणि त्यातून गर्भधारणा झाली असेल तर कायद्यानुसार जर रुग्णाची लग्नाची सोडचिठ्ठी झाली असेल तर
कायदेशीर गर्भपाताची कारणे काय?
गर्भपात कधी करावा यासाठी काही कायदेशीर निकष लावण्यात आले आहेत. त्यानुसार सोनोग्राफीनुसार अर्भकास व्यंग असेल तर गर्भनिरोधक साधने वापरूनही गर्भ राहिला असेल तर, गर्भधारणेमुळे आईच्या जीवितास धोका निर्माण होणार असेल तर आणि पीडितेवर बलात्कार झाला असेल व त्यातून गर्भधारणा झाली असेल तर अशा परिस्थितीत गर्भपात करण्यास कायद्याने मान्यता देण्यात आली आहे. वैद्यकीयदृष्ट्या गरोदर राहिल्यानंतर २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो.